विधानसभा मतदार संघासाठी 5 उमेदवारांचे 6 अर्ज दाखल 261 उमेदवारांना 647 नामनिर्देशन अर्जाचे वितरण

जालना, दि.23 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 99- परतूर, 100-घनसावंगी, 101-जालना, 102- बदनापूर (अ.जा.) आणि 103-भोकरदन या पाच विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज 3 उमेदवारांनी 3 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आजपर्यंत एकुण 5 उमेदवारांचे 6 नामनिर्देशन अर्ज स्विकारण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे. 99-परतूर, …

Read more

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

जालना, दि. 23 :- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी गणेश महाडिक यांनी जारी केले आहेत. संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश दि. 22 ऑक्टोबर 2024 …

Read more

साखर कारखानदारीने घनसावंगी तालुक्याचे राजकीय वजन वाढले …!

Sugarcane news ghansawangi

भारतरत्‍न न्‍यूज (सुरेश दाड) :-मागील पंधरवाड्यात घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव परिसरात डॉ. हिकमत उढाण यांच्या नियोजित साखर कारखान्याचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांच्या शुभहस्ते थाटात संपन्न झाले. घनसावंगी तालुक्यात होत असलेला हा चौथा साखर उद्योग आहे. वाढत्या साखर उद्योगामुळे तालुक्यातील राजकारणाला चांगलीच कलाटणी मिळत असून, साखर कारखानदारीने घनसावंगी तालुक्यालाविशेष महत्व प्राप्त झाले आहे. यामुळे …

Read more

संततधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी, मेडिकल दुकानादारांचे तहसीलदारांच्‍या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

Demand for compensation for damage caused by incessant rains

भारतरत्‍न न्‍यूज (सुरेश दाड) :-दिनांक १ आणि २ सप्टेंबर रोजी झालेल्या संततधार पावसामुळे शेतीपीकांसह अनेकांच्या मालमत्तांचेही नुकसान झाले. घनसावंगी शहरातील काही मेडिकल दुकानांच्या गोदामांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने, औषधांचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याची मागणी, एका लेखी निवेदनाद्वारे घनसावंगीच्या तहसीलदार योगिता खटावकर यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात …

Read more

पत्रकारांच्‍या उपस्थितीत “भारतरत्‍न न्‍यूज” या ऑनलाईन पोर्टलचा शुभारंभ ! संपादक सुरेश दाड यांना सर्वांनी दिल्‍या शुभेच्‍छा !

Launch of online portal Bharat Ratna News in the presence of journalists

भारतरत्‍न न्‍यूज :-घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे पत्रकार सुरेश दाड यांच्‍या भारतरत्‍न न्‍यूज या ऑनलाईन न्‍यूज पोर्टलचा शुभारंभ स्‍वातंत्र्यदिनी (15 ऑगस्‍ट) सर्व पत्रकारांच्‍या उपस्थितीत संपन्‍न झाला. यावेळी भारतरत्‍न न्‍यूजचे संपादक सुरेश दाड यांच्‍यासह सर्वश्री पत्रकार इब्राहीम पठाण, लक्ष्‍मण बिलोरे, परवेज पठाण, किशोर शिंदे, विठ्ठल काळे, अजय गाढे, गणेश ओझा, नरेंद्र जोगड, भागवत बोटे, संभाजी कांबळे, …

Read more

ग्रामीण भारताच्या विकासासाठी ग्रामीण रस्‍त्‍यांचे मजबुतीकरण करणे आवश्‍यक !

Rural roads need to be strengthened for the development of rural India

भारतरत्‍न न्‍यूज (सुरेश दाड) :-राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामीण भारतातील सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने रस्त्यांचे डांबरीकरण करणे आवश्यक आहे. भारतातील राष्ट्रीय व राज्यरस्त्यांचा झपाट्याने विस्तार आणि डांबरीकरण झाले आहे. यामुळे दळणवळणाची साधने उपलब्ध झाल्यानंतर विकासदराला वेग आला आहे. पर्यायाने शहरी विकासाला जोरदार चालना मिळाली आहे. या मुकाबल्यात ग्रामीण भागातील विकास दूरच असल्याने खेड्यातील जीवनमान अजूनही बऱ्याच अंशी …

Read more

ग्रामीण शैक्षणिक पाया सक्षम करण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज !

Need to improve educational standards in rural areas

भारतरत्‍न न्‍यूज (सुरेश दाड) :-आजचा विद्यार्थी उद्याच्या भारत देशाचा कणा आहे. त्यामुळे शैक्षणिक पाया मजबूत होणे गरजेचे आहे. परंतु ग्रामीण भागात आजही शैक्षणिक दुरावस्था आहे. आजचे युग माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. आज आपण एकविसाव्या शतकाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत पोहोचलो आहोत. विज्ञानाने भक्कम प्रगती केली आहे. असे असले तरीही ग्रामीण भागातील समस्यांचे पेव आहे. जग चंद्रावर आहे …

Read more

ग्रामीण आरोग्य सेवा गैरसोयीच्या कचाट्यात ! गोरगरीबांना आर्थिक भुर्दंड !

Need to empower rural health services

भारतरत्‍न न्‍यूज (सुरेश दाड) :-ग्रामीण भागातील आरोग्य सेवा गैरसोयीच्या कचाट्यात असून, पुरेशा आरोग्य सुविधांअभावी रूग्णांना आर्थिक भुर्दंड सोसण्याची वेळ येते. अनेक ठिकाणी बराच वेळा वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपलब्ध न होणे, औषधांचा तुटवडा असणे, याशिवाय लसींचा तुटवडा आदी असुविधामुळे रूग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. यामुळे गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची वेळ येते. यातून रूग्णांना …

Read more

सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग धंद्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकांनी जाचक अटी विना कर्ज पुरवठा करण्याची गरज

Nationalized banks need to provide loans easily

भारतरत्‍न न्‍यूज (सुरेश दाड) :-संगणकीय पर्व सुरू झाल्यानंतर शिक्षणाचा प्रसार, प्रचार वाढला, त्यामुळे शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले. याचाच परिणाम पदविकाधारक, पदवीधर निर्माण झाले. सुशिक्षितांची संख्या वाढल्याने कामदार कमी आणि बेकार जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली. यातून बेरोजगारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. शासनाने बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी उद्योगधंद्यांना प्राधान्य देत, विविध योजनांच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँकांमार्फत …

Read more

सामाजिक एकतेचे दर्शन घडविणारे गाव म्‍हणजे कुंभार पिंपळगाव

Kumbhar Pimpalgaon is a village that represents social unity

भारतरत्‍न न्‍यूज (सुरेश दाड) :-घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव अखंड एकता जोपासणा करणारे गाव असल्याचे, या गावाच्या रचनेवरून दिसून येते. अलीकडे या गावाचा झपाट्याने विस्तार झालेला आहे. गावाच्या चारही दिशांना वसाहती वाढलेल्या आहेत.या गावातही अठरा पगड जातीधर्माचे वास्तव्य असून, सलोखा आणि एकात्मता नांदत आहे. जुन्या गावाची रचना, सामाजिक एकतेचे दर्शन घडविणारी रचना असून, राष्ट्रीय एकात्मतेची साक्ष …

Read more